बंद

    प्रस्तावना

    लोहार समाजाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याची मागणी अनेक वर्षांपासून लोकप्रतिनिधी आणि विविध संघटनांकडून केली जात आहे. राज्यातील भटक्या जमाती-ब प्रवर्गात समाविष्ट असलेला लोहार समाज हा मुख्यतः लोखंडाच्या वस्तू बनवण्याच्या व्यवसायात आहे. लोहार समाजातील तरुणांना वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळांतर्गत चालवल्या जाणाऱ्या विविध योजनांचा (बीज भांडवल योजना, थेट कर्ज योजना, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना) लाभ मिळून लोहार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करण्यासाठी वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळांतर्गत उपकंपनी म्हणून ब्रह्मलीन आचार्य दिव्यानंद पुरीजी महाराज आर्थिक विकास महामंडळाची (उपकंपनी) स्थापना करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार, सदर महामंडळ (उपकंपनी) स्थापन करण्यास दिनांक १० ऑक्टोबर २०२४ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयानुसार वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळांतर्गत “ब्रह्मलीन आचार्य दिव्यानंद पुरीजी महाराज आर्थिक विकास महामंडळ” या उपकंपनीची स्थापना करण्यास संदर्भाधीन दिनांक १५ ऑक्टोबर २०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. सदर शासन निर्णयानुसार काही सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.