रु.१.०० लक्षपर्यंतची थेट कर्ज योजना
-
शासनाकडून प्राप्त भाग भांडवलातून महामंडळ ही योजना राबविते.
-
रु.१.०० लक्ष पर्यंत थेट कर्ज उपलब्ध.
-
लाभार्थीचा सहभाग निरंक.
-
४८ समान मासिक हप्त्यांमध्ये मुद्दल रु.२,०८५/- नियमित परतफेड करणाऱ्या लाभार्थीना व्याज आकारण्यात येणार नाही. नियमित कर्जाची परतफेड न करणाऱ्या लाभार्थीना जेवढे कर्जाचे हप्ते थकित होतील त्या रक्कमेवर द.सा.द.से. ४% व्याज आकारण्यात येईल.
रु.१.०० लाख थेट कर्ज योजना अर्जाचा नुमना पीडीएफ( १ एमबी)
लाभार्थी:
लाभार्थी हा महाराष्ट्र राज्यातील लोहार या समाजातील असावा
फायदे:
कर्ज रक्कम ४८ समान मासिक हप्त्यामध्ये मुद्दल रु. २,०८५/- नियमित परतफेड केल्यास लाभार्थींना व्याज आकारण्यात येणार नाही. परंतू नियमित परतफेड न करणा-या लाभार्थींना जेवढे कर्जाचे हप्ते थकीत होतील, त्या रक्कमेवर द.सा.द.से.४% व्याज आकारण्यात येईल
अर्ज कसा करावा
सदर अर्ज महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात ऑफलाईन सादर करावा